कडलास येथे सकाळी उपोषणास सुरुवात..

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कदलास गावामध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कडलास ग्रामस्थांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या उपोषणाला समाजातील विविध घटकानी पाठींबा दिला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन लिंगायत समाजाचे सिद्धेश्वर ढेबे, नाभिक समाजाचे सुजित काशीद, मुस्लिम समाजाचे सैफ अली पटेल, अजित शेटे सर्व यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.. गाव पातळीवरती आम्ही एक आहोत. हा संदेश या द्वारे देण्यात आला आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी उपस्थित सर्व सकल मराठा समाज व मराठेत्तर इतर समाज बांधवानी केली आहे.