मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये ग्रामीण भागातुन दररोज हजारो शेतकरी आपला शेतमाल विक्री साठी येत असतात. त्याचप्रमाणे अनेक व्यापारी शेतमाल खरेदी विक्री करणेसाठी येतात.मंगळवेढा बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात व्यापारी व शेतकऱ्यांसाठी शुद्ध पेयजल सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.
मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये वर्षभर ज्वारी, हरभरा, करडी डाळींब कांदा, भाजीपाला, शेळी मेंढी आदि शेतमालाच्या विक्रीसाठी तालुका परिसरातून शेकडो वाहने येत असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.आवारात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सभापती सुशील आवताडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती. मंगळवेढा बाजार समितीच्या संचालक मंडळाने शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देणेचा निर्णय घेऊन बाजार आवारामध्ये शेतकरी व आवारात काम करणाऱ्या घटकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी वाटर कुलर व R.O.प्लांट ची व्यवस्था केली आहे.