आज विट्यात होणार नृत्याचा कार्यक्रम! सुप्रसिद्ध सेलिब्रिटीची एन्ट्री….

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष लखन (आप्पा) ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त विट्यात आज जंगी नियोजन करण्यात आलेले आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त विट्यात नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर प्रमुख आकर्षण असणार आहेत. आज सायंकाळी सहा वाजता पंचफुला मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.