वाळवा तालुक्यातील शिरटे या गावातील निवास आनंदा पवार यांनी वयाची ५३ वर्षे पूर्ण करताना इस्लामपूर येथे जायंटस ग्रुपच्या सभागृहात अवयवदान आणि देहदानाचे संकल्प पत्र अर्जुन पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
आपल्या अवयव दानातून अनेकांना पुनर्जन्म मिळावा ही आस मनी बाळगून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.इस्लामपूर येथील जायंटस ग्रुप या सेवाभावी संस्थेकडे निवास पवार यांनी पत्नी जयश्री पवार भाचे दिगंबर पाटील यांचे उपस्थितीत आपला संकल्प लिहून दिला.जायंट्स ग्रुपने आजवर १४८ नेत्रदान आणि १८ त्वचादान घडवून आणण्यात यश मिळविले आहे, त्यामुळे २९६ अंधाना दृष्टी मिळाली आहे. आजवर त्यांनी ६१ वेळा रक्तदानही केले आहे.