इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली. यावेळी पाटील बोलते होते. मुसळधार पाऊस पडूनही वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेवेळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भर पावसामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी डोक्यावर खूर्च्या घेत जागा सोडली नाही. पाऊस होत असताना सभास्थळी जयंत पाटील छत्री घेऊन उभे होते.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, बजरंग सोनवणे, आमदार सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, ‘युवक’चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, नागेश पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर बहिणींना यापेक्षा आणखी चांगला लाभ देऊ. आमच्या माता, भगिनी आणि मुलींच्या केसाला धक्का लागणार नाही, असा कायदा बनवू. सामान्य नागरिकांचे जगणे सुसह्य आणि सुलभ होईल, अशा पद्धतीची धोरणे राबविण्यात येतील.त्यामुळे राज्यातील जनतेने महायुतीला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडीला बळ द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.