सांगोला तालुक्यातील सोनंद येथे ज्ञानेश्वर कोळसे-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सावित्रीबाई फुले प्रशाला व जुनिअर कॉलेज सोनंद, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल सोनंद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची लोकप्रिय लाडकी वाहिनी, मराठी वाहिनी, सन टीव्ही च्या मदतीने धमाल मस्तीचा गमतीचा असा व रंगतदार महिलांसाठी चला तर जिंकूया पैठणी कार्यक्रमाचे आयोजन २८ जून रोजी दुपारी २ वा. सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनियर कॉलेज सोनंद येथे आयोजीत करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व महिला सहभागी होऊ शकतील. या कार्यक्रमांमध्ये आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये विजेती ठरणाऱ्या महिलेला एक आकर्षक पैठणी भेटणार आहे.
परिसरातील महिलांनी खास करून प्रशालेतील माता पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी कोळसे-पाटील, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता शेडसाळे यांनी केले आहे.
उद्या सांगोला तालुक्यात होणार जिंकूया पैठणी कार्यक्रम!
