शुक्रवार दि २९ रोजी सांगोला येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राहिलेल्या दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पराभवाचे चिंतन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला हजारो दिपकआबा प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. सांगोला तालुक्याचा सर्वांगीण आणि गतिशील विकास करायचा असेल तर शहाजीबापू पाटील आणि दिपकआबा साळुंखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील जय वीरू एकत्र आले पाहिजेत. दोघे एकत्र आले तर सांगोला तालुक्याच्या विकासाची बुलेट ट्रेन आणखी वेगाने धावेल म्हणून दोघांनीही झाले गेले विसरून पुन्हा एकदा एकत्र यावे असा आग्रह चिंतन बैठकीत कार्यकर्त्यातून पुढे येत होता.
जय वीरू पुन्हा एकत्र आले पाहिजेत… सांगोला तालुक्याच्या विकासाची बुलेट ट्रेन आणखी वेगाने धावेल
