सध्या दीपक आबा यांच्या गाव भेट दौऱ्याची चर्चा सुरू आहे. पण भाळवणी जिल्ह्यामध्ये त्यांचं अभूतपूर्वक स्वागत केलेले आहे.सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत होत आहे. शनिवार दिनांक 24 रोजी भाळवणी जिल्हा परिषद गटातील बंडी शेगाव शेवाळे आणि खेड भाळवणी या गावांमध्ये दीपक आबांना तुफान प्रतिसाद मिळालं भाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गाव भेट आणि जनसंवाद दौरा सुपर हिट होऊ लागला आहे .
दीपक आबांच्या गाव भेट दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समाधान काळे यांच्यासह खेद भाळवणी येथील माजी प्राचार्य आर .डी .पवार सरपंच संतोष साळुंखे माननीय उपसरपंच लक्ष्मण साळुंखे आणि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .आधी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते .पंढरपूर तालुक्यातील आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडी शेगाव आणि या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर ,वेताळवाडी, गणेश मंदिर परिसर, आझाद चौक,अण्णाभाऊ साठे नगर ,डोंबारी वस्ती परिसर ,शाहूनगर परिसर ,कोळ्यांचा मळा परिसर, माने वस्ती ,चव्हाण वस्ती, माळूनकर वस्ती ,कवडे वस्ती ,सुरवसे वस्ती, उपरी रोड परिसर तसेच चौगुले वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला
तसेच शनिवारी दुपारच्या सत्रात शेळवे गावातील देवीचे मंदिर ,वकील वस्ती ,दंडवस्ती, खंडोबा मंदिर परिसर, बंडाचा मळा परिसर, दादाचा मळा परिसर तसेच बरेड वस्ती आणि खोराडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी व्यथा जाणून घेतल्या आणि त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला .
तर शनिवार दिनांक 24 रोजी सायंकाळच्या सत्रात खेड भाळवणी गावातील पवार वस्ती, जुना अकलूज रस्ता परिसर ,रेणुका नगर, शिवाजीनगर, जिजाऊ नगर ,संभाजीनगर आणि मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
चौकट भाळवणी जिल्हा सांगोला मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटातील मतदारांकडे पाहिले होते .परंतु प्रथमच माजी आमदार दीपक व साळुंखे पाटील हे प्रत्येक गावातील वाड्यांवर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत. भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या नेत्यांनी जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला आहे. दीपक आबांच्या कामाची आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी दिला आहे .