Maharashtra Budget : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा! अजित पवारांचे बजेट A To Z 

विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला. त्यामध्ये शेतकरी, महिला, युवक आणि सर्व घटकांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली.

तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना कायम ठेवण्यात आली आहे. तसेच प्रती दिंडी 20  ⁠हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर  आहे, तो पेट्रोल डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत घटवला आहे.

महिलांसाठी काय?

मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करत आहोत. 
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत.


मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफ करण्यात येणार.
स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.

राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील. बस प्रवासात सवलत. मुद्रांक शुल्कात सवलत.
वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील.
⁠बचत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार निधी देण्यात येईल.⁠यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे.आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना ⁠व्यावसायिक शिक्षणामध्ये शंभर टक्के सवलत दिली जाणार.

शेतकऱ्यांसाठी काय?

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचं अनुदान. गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार.

येत्या दोन वर्षात 163 सिंचन  प्रकल्प पूर्ण होतील.
⁠सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15,000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे.
⁠3200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे. ⁠शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे.

⁠मागेल त्याला सौरपंप दिला जाणार आहे.अभ्यासक्रम पुर्ण करणारे तरुण जास्त आहे. ⁠10 हजार रुपये विद्यावेतन दिल जाईल. संजय गांधी निराधार योजनेला 1 हजारावरुन दीड हजार रुपयांच अनुदान मिळालं.
शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आलंय.

⁠नवीन रुग्न वाहिका खरेदी केल्या जातील. ⁠मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राबवली जाईल. मुंबई किनारी मार्गाच काम जवळपास पूर्ण झालेलं आहे.,⁠दोन ही मार्गीका खुल्या केलेल्या आहेत. रायगड किल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जाईल त्याचा खर्च राज्य सरकार करणार आहे .
माळशेज घाटात व्हयुविंग गॅलेरी उभारण्यात येणार.

वारकऱ्यांसाठी काय?  

तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज प्रस्थान होत आहे. ⁠लाखो वारकरी आहेत प्रत्येकी वारीला 20  ⁠हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ⁠सर्व वारकरी यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. ⁠मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित.
प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार.