T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनल सामन्याला काही तासांचा अवधी बाकी आहे. टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका दोन्ही संघ फायनलध्ये एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना 29 जूनला संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. या सामन्याआधी ICC ने घेतला मोठा निर्णय घेतलाय. आयसीसीने फायनलपूर्वी एक बैठक बोलावल्याची माहिती समजत आहे. नेमकी ही बैठका का बोलावली आहे? बैठकीली क्रिकेट बोर्डांच्या अध्यक्षांना का बोलावलंय जाणून घ्या.
आयसीसीने बोलावलेल्या बैठकीला भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानसह या देशांचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी हे भेटू शकतात. मोहसिन हे पाकिस्तान देशातील सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री आहेत. आता ते एका बैठकीसाठी अमेरिकेला आले आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर ते थेट वेस्ट इंडिजला येऊ शकतात.
आयसीसीने ही बैठक चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बोलावली आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपदही पाकिस्तानला देण्यात आलं आहे. मात्र टीम इंडियाने आता मागे झालेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी नकार कळवला होता. फायनलपूर्वी होणाऱ्या बोर्ड सदस्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली टीम पाकिस्तानध्ये पाठवणार नाही. त्यामुळे पाकिस्तानमधून चॅम्पियन ट्रॉफी बाहेर हलवाली लागेल. मात्र यासाठी पाकिस्तान संघाचा कडाडून विरोध असणार आहे.
दरम्यान, आयसीसीची बैठकी झाली नाहीतरी उद्या जगाला टी-२० चा वर्ल्ड कप विनर संघ दिसणार आहे. टीम इंडिया की साऊथ आफ्रिका कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी आतुर आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत एकही वर्ल्ड कप जिंकलेला नाही त्यामुळे साऊथ आफ्रिकेला इतिहास रचण्याची संधी आहे.