पुणे : तरुणांनी(Youths) कायद्याचे उल्लंघन करून पुणे-सातारा महामार्गावर थिल्लरबाजी केली आहे. सध्या, तरुणांच्या या थिल्लरबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या तरुणांनी चक्क चालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येऊन व्हिडिओ बनवला आहे. इतकंच नाही, तर या तरुणांनी कारमध्ये सुरू असलेल्या गाण्यावर देखील डान्स केला आहे. तरुणांची थिल्लरबाजी नवले ब्रिज ते नवीन कात्रज बोगदा दरम्यान सुरू होती. यादरम्यान, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आणि शेअर केला.
नेमकं काय घडलं ?
16 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास तरुणांनी(Youths) पुणे-सातारा महामार्गावर धोकादायक थिल्लरबाजी करण्यास सुरुवात केली. महामार्गावरील मुख्य २ लेनवर येताच तरुणांनी चालत्या कारच्या खिडकीमधून बाहेर येत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हे प्रकरण करून त्यांनी इतर प्रवाशांचा जीव देखील धोक्यात घालण्याचा प्रकार केला.
व्हिडिओमध्ये तरुणांची थिल्लरबाजी
या महामार्गावरून जाताना एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये 2 कार स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये थिल्लरबाजी होत असल्याचा प्रकार स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण खिडकीच्या बाहेर डोकावून धिंगाणा घालत आहेत, तर काही तरुण कारमध्ये गाणी लावून डान्स करत असताना दिसत आहेत.
तरुणांनी कायद्याचे केले उल्लंघन
चालत्या कारमधून अशा प्रकारची थिल्लरबाजी करणं स्वतःसोबत इतरांच्या जीवाशीदेखील खेळण्याचाही प्रकार आहे. ‘व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांनी या घटनेवर त्वरित लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.