बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील टीम इंडियाचं वाईट प्रदर्शन आणि ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेर लीक होणं यानंतर बीसीसीआयने भारतीय कोचिंग स्टाफवर आता कारवाईचा(action) बडगा उगारला आहे. हेड कोच गौतम गंभीरचा असिस्टंट अभिषेक नायर , फिल्डिंग कोच टी. दिलीप आणि ट्रेनर सोहम देसाई यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. मात्र अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दैनिक जागरणने याबाबत रिपोर्टमधून माहिती दिली आहे.
आठ महिन्यांपूर्वी झाली होती नियुक्ती :
दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलीमध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारताचा 1-3 ने दारुण पराभव झाला होता. त्यानंतर बीसीसीआय कारवाईच्या(action) तयारीतच होती. हेच कारण आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर सुद्धा आठ महिन्यांपूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या अभिषेक नायर याला बीसीसीआयने बाहेरचा रस्ता दाखवलाय. अभिषेक नायर याला हेड कोच गौतम गंभीर याच्या अत्यंत जवळचा मानले जाते.
फिल्डिंग कोच टी. दिलीपला सुद्धा काढलं :
बीसीसीआयने फक्त अभिषेक नायरलाच नारळ दिला नाही तर टी. दिलीप यांना सुद्धा नोकरीवरून काढण्यात आलं आहे. दिलीप टी दिलीपच्या येण्याने भारतीय संघाच्या फिल्डिंगमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. प्रत्येक सामन्यानंतर बेस्ट कॅचिंग अवॉर्डच्या परंपरेची सुरुवात सुद्धा त्याच्याच कार्यकाळात सुरु झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआय या लोकांना नोकरीवरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी कोणत्या दुसऱ्या व्यक्तींना सध्यातरी नियुक्त करणार नाही.
एड्रियन लि रूचा सपोर्ट स्टाफमध्ये होणार समावेश :
फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सितंशू कोटक आधीच भारतीय संघाशी संबंधित आहेत. फील्डिंग कोच टी. दिलीप यांचे काम सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेश्कोट यांच्याकडून केले जाऊ शकते तर ट्रेनर सोहम देसाईच्या जागी एड्रियन लि रू हा सपोर्ट स्टाफमध्ये येऊ शकतो असं म्हटलं जातंय. दक्षिण आफ्रिकेच्या अॅड्रियनला एक लांब आयपीएल अनुभव आहे. तो 11 वर्षे केकेआरच्या सहाय्यक कर्मचार्यांचा भाग आहे. सध्या ते पंजाब किंग्स सोबत काम करत असून 2002 ते 2003 पर्यंत भारतीय संघासोबत काम करत होते.