विरोधकाकडून आज पुन्हा विधानसभेत नागपूर अमरावती महामार्गावरील चामुंडी ब्लास्टचा मुद्दा मांडला जाणार.
चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट मिलिटेड कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार लक्षवेधित मांडणार.
सातत्याने या ठिकाणी स्फोट होत असतानाही सरकारने याप्रकरणात कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याचा आरोप.
मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाची आणि कंपनी व्यवस्थापनाकडून ठोस मदत मिळवून देण्याची मागणी.
दुसरीकडे विधानपरिषदेत सतेज पाटील आणि काँग्रेस नेत्यांकडून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा मांडला जाणार.
शक्तिपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध असल्याने सरकारने त्या अनुषंगाने कार्यवाही आणि उपाययोजना करावी अशी लक्षवेधित मागणी.