दिल्ली कॅपिटल्स टॉपला, तर राजस्थान रॉयल्सला बसला फटका;

आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) दररोज रोमांच वाढत आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Rajasthan Royals VS Delhi Capitals) यांच्यात पार पडलेल्या सामन्यात नव्या आयपीएल सीजनची पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात झालेल्या सुपर ओव्हरचा रोमांच कोणत्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नव्हता. नो बॉल, रन आउट … आणि सिक्स असं होऊन सामना संपला. तेव्हा राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात झालेल्या सुपर ओव्हरमध्ये काय काय घडलं याविषयी जाणून घेऊयात.

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करून राजस्थानला विजयासाठी 189 धावांचं टार्गेट दिलं. विजयाचा पाठलाग करताना 19 व्या ओव्हरला राजस्थानचा स्कोअर 180 धावा होता. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याना विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी मिचेल स्टार्ककडे गोलंदाजी देण्यात आली. या ओव्हरमध्ये एकापेक्षा एक उत्तम बॉल टाकून राजस्थानचे फलंदाज ध्रुव जुरेल आणि सिमरन हेटमायर यांना केवळ 8 धावाच जोडायला दिल्या. ज्यामुळे दोन्ही संघांचा स्कोअर बरोबर झाला आणि सामना सुपर ओव्हरवर गेला.

सुपर ओव्हरमध्ये राजस्थानची पहिली बॅटिंग

6-6 बॉलची सुपर ओव्हर खेळताना पहिली बॅटिंग राजस्थान रॉयल्सला देण्यात आली. हेटमायर आणि रियान पराग यांची जोडी मैदानात आली. मिचेल स्टार्ककडे पुन्हा गोलंदाजी सोपवण्यात आली. सुरुवातीच्या तीन बॉलमध्ये एक चौकारसह 5 धावा बनल्या. चौथा बॉल नो बॉल होता ज्यावर परागने चौकार मारून फ्री हिट सुद्धा मिळाली. पण त्याचा रियानला फायदा मिळाला नाही कारण तो पुढच्या बॉलवर आऊट झाला. पुढच्या बॉलवर हेटमायरने 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात रनआउट झाला. ज्यामुळे अवघ्या 5 बॉलमध्ये राजस्थानचा संघ ऑल आऊट झाला. राजस्थानने सुपर ओव्हरमध्ये 11 धावा केल्या आणि देखील विजयासाठी 12 धावांचे आव्हान दिले.

4 बॉलमध्ये जिंकली दिल्ली

विज्यास्तही मिळालेलं 12 धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं फक्त ४ धावांमध्ये पूर्ण केलं. केएल राहुलने सुरुवातीच्या तीन बॉलमध्ये एक चौकार आणि एक डबल तसेच एक सिंगल धाव घेऊन 7 धावा केल्या. तर चौथ्या बॉलवर ट्रिस्टन स्टब्सने सिक्स ठोकला आणि विजय दिल्लीच्या पदरात पाडला. राजस्थानकडून ही सुपर ओव्हर संदीप शर्मा यांनी फेकली होती.