इचलकरंजीत कचऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष….

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने कचरा उठावाचे कोट्यावधीयाचा मक्ता तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने दिला होता. सदर मक्तेदाराबाबत अनेक तक्रारी असतानाही त्याची मुदत संपल्यानंतर ही सन २०२१ पासून सतत त्या मक्तेदाराला मुदतवाढ दिली गेली .पावसामुळे कचरा कुजल्याने गृहनिर्माण संस्थांमध्ये दुर्गंधीचे वातावरण पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारवार मुदतवाढ देत मक्तेदारावर कोट्यावधी रुपये उधळूनही कचरा उठाव होत नाही यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

कचरा उठाव वाहने व वाहनांसाठी येणारा देखभाल दुरुस्तीच्या खर्च ही मक्तेदाराला दिला जातो. तरीही अनेक वर्षापासून कचरा उठावाचे नियमित काम करताना दिसत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पाऊस पडल्याने कचरा कुजू लागला आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून अनेक ठिकाणच्या गटरी साफ केल्या नसल्यामुळे तुंबल्या आहेत तर अनेक ठिकाणी गटारींची दुरावस्था झाली आहे. परिणामी आरोग्यावर परिणाम होत आहे