इचलकरंजी हुन रुकडी ला एसटी सेवा सुरू! जल्लोषात स्वागत…..

हातकणंगले तालुक्यातील रुकडी या गावची लोकसंख्या 30 हजाराच्या घरात आहे. या गावांमधील अनेक शेतकरी, विद्यार्थी तसेच अनेक गावकरी हे नोकरी निमित्त इचलकरंजी येथे जात असतात. मात्र इचलकरंजीला जाण्यासाठी एसटी नसल्यामुळे वडाप शिवाय त्यांना पर्याय नाही. परंतु वडाप हे पूर्ण भरल्याशिवाय जात नसल्याने त्याचा फटका हा विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांना होत होता.

रुकडी, साजणी, तिळवणी, माणगाव, माणगाव वाडी या गावातून विद्यार्थी यांना एसटी बसची सोय नसल्याने त्यांना अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास सवलत व नागरिक व महिला यांना निम्म्यादराच प्रवास या सवलतीचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जाणारी एसटी व कोल्हापूर इचलकरंजीकडे जाणारी एसटी ही रुकडी मार्गे सुरु करावी अशी मागणी सरपंच राजश्री संतोष रूकडीकर यांनी केलेली होती आणि त्यांच्या या मागणीला यश आलेले आहे.

दररोज इचलकरंजी ते रुकडी व रुकडी ते इचलकरंजी अशा एसटीच्या तीन फेऱ्या सुरू झालेले आहेत. एस.टी रूकडीत आल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने एसटीचे पूजन करत स्वागत करण्यात आले.