महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा आणि गाठीभेटींचा धडाकाच सुरू केला आहे.त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागले असून भरारी पथके, स्थिर पथके, पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करत आहे.
ज्यांचा कधी विकासाशी संबंधच आला नाही ते विकासकामांच्या गप्पा मारत आहेत. काम न केल्यामुळे विकासाच्या मुद्यावर बोलता येत नाही, म्हणूनच आमच्यावर व्यक्तिगत टीका करून सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत; पण सुज्ञ जनता त्यांना भाळणार नाही, तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला साथ देईल. त्यामुळे राहुल आवाडे हेच आमदार होणार’, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ रायगड कॉलनी येथे महिला मेळावा झाला. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. या मेळाव्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.