उद्यापासून आष्टा भावई उत्सवास होणार सुरुवात

महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीचा सुप्रसिद्ध ‘भावई उत्सव’ उद्या सोमवार दि. १ जुलै ते बुधवार, दि. १० जुलै अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. शहरात ठिकठिकाणी आकाश पाळणे, खेळणी व खाद्य पदार्थांचे, मिठाईचे स्टॉल लागले आहेत. या भावई उत्सवामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीचे खेळगडी, मानकरी एकत्र येऊन परंपरागत पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. सोमवार दि. १ जुलै रोजी पहाटे ४ वाजता दिवा म्हणजेच दीपपूजा या धार्मिक कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात होणार आहे.

मंगळवार दि. २ जुलै रोजी रात्री ११ वाजता कंकण विधी, बुधवार दि. ३ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता अळूमळू याच दिवशी रात्री १० वाजता घोडी, गुरुवारी दि. ४ जुलै रोजी जोगणी उपवास, सकाळी ९ वाजता पिसे, सायंकाळी ७ वाजता कर, शुक्रवार ५ जुलै रोजी पहाटे २ वाजता जोगण्या, सायंकाळी ५ वाजता लोट, शनिवार ६ जुलै रोजी पहाटे १ वाजता मखोटे व ११ वाजता पाखरे,

बुधवारी १० जुलै रोजी सकाळी ६ वाजता खाटले व सायंकाळी ७ वाजता सती हे खेळ व विधी मानकरी, खेळगडी, भाविकांच्या उपस्थितीत विविध वाद्यांच्या गजरात भक्तिभावाने साजरे होणार आहेत. आष्टा पोलीस, पालिका प्रशासन या उत्सवासाठी सज्ज आहे.