जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट!

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं. तेल विपणन कंपन्यांनी पहाटे ६ वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर जवळपास ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे.आज पहाटेपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीन दर जारी केले जातात.

आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. १९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडर जवळपास ३० ते ३१ रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५९८ रुपये इतकी झाली आहे.

तर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आता १६४६ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर १८४०.५० रुपयांऐवजी १८०९.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर १७५६ रुपये इतके झाले आहेत.