टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान

भारतीय संघाने शनिवारी T-20 विश्वचषक जिंकला आणि 17 वर्षांचा दुष्काळ संपला. संपूर्ण देशभरात या विजयाचा आनंदोत्सव साजरा होत असताना आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच किंग कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली.

आयसीसीनं टीम ऑफ द टुर्नामेंट जाहीर केली आहे. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या,अर्शदीप सिंग,रहमानुल्लाह गुरबाझ, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, राशिद खान, फाजलहक फारुकीचा समावेश आहे. तर, बारावा खेळाडू म्हणून नॉर्खियाचा समावेश करण्यात आला आहे.

रोहित शर्मानं स्पर्धेत 257 धावा केल्या. भारताला त्यानं विजेतेपद मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं 92 धावांची खेळी केल तर इंग्लंड विरुद्ध 57 धावांची महत्त्वाची खेळी केली.

अक्षर पटेलनं स्पर्धेत 92 धावा केल्या. 9 विकेट घेतल्या.सूर्यकुमार यादवनं 199 धावा केल्या यामध्ये इंग्लंड विरुद्धची 47 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. तर, डेव्हिड मिलरचा कॅच गेमचेंजर ठरला. हार्दिक पांड्यानं 144 धावा केल्या तर त्यानं 11 विकेट घेतल्या. फायनलमध्ये त्यानं 3 विकेट घेतल्या.

जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्यानं 15 विकेट घेतल्या. फायनलमध्ये त्यानं दमदार कामगिरी केली.अर्शदीप सिंग देखील यशस्वी ठरला त्यानं 17 विकेट घेतल्या. त्याला देखील आयसीसीनं टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये घेतलं आहे.