म्हैसाळ योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात मान्यता १५९४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात हे काम सुरू होणार असून, येणाऱ्या तीन महिन्यात या पथदर्शी उपक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.म्हैसाळ पथदर्शी उपक्रम असणार आहे.
टप्प्याटप्प्याने टेंभू आणि ताकारीसाठी देखील सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. याचा फायदा मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचेही माजी खासदार पाटील म्हणाले.
तसेच केंद्र शासनाकडून यासाठी जागतिक बँकेकडून हमी देण्यात आली आहे. यामुळे वीज बिल थकबाकीचा प्रश्न सुटणार असून, जत येथे २०० हेक्टरवर होणार प्रकल्प होणार आहे. २०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे. २.३५ % वर्षाला व्याजाने ही रक्कम मिळणार आहे. सर्व प्राथमिक सर्व्हेक्षण, तपासण्या केल्या आहेत.