मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली. खासकरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शिंदेंनी कोपरखळ्या देखील लगावल्या.महाविकास आघाडीच्या स्पर्धेत जयंत पाटील सर्वात पुढे आहेत, त्यामुळेच नाना पटोले फिल्डवर जाऊ लागले, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.
आता जयंत पाटील यांनीही शिंदेंवर पलटवार केलाय.मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहिण योजना राबवली होती. त्या राज्यात म्हणजे मध्यप्रदेशात ती अतिशय लोकप्रिय ठरली. मात्र, ज्या शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना राबवली, त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही.
एकनाथ शिंदेंना हे माहिती आहे की नाही? हे मला माहिती नाही. या योजनेमुळे त्यांच्यावर काय संकट आहे, हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी ही योजना अजित पवारांना मांडण्यास सांगितली, असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.