अलीकडे अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी चालू आहे. काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेले तीन दिवस जिल्ह्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला होता. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरच्या धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे मुसळधार पाऊस पडला आहे.
परिणामी पंचगंगा पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीवरील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर धरण क्षेत्रात ही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरण देखील ३३.२२ टक्के भरला आहे. तर राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचनातून ११०० क्युसेक्स पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात आले आहे. तसेच घटप्रभा प्रकल्पातून ९२१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे येत्या काळात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.