सांगलीचे पालकत्व कोणाकडे? लागली उत्सुकता….

महापालिका, जिल्हापरिषद आणि महापालिकेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सत्तारूढ महायुतीला सांगली जिल्ह्याने पाच आमदार देऊनही एकही मंत्रीपद मिळालेल नाही. त्यामुळे खुद्द पालकमंत्री देखील आता आयात करावा लागणार आहे. या परिस्थितीत सांगलीचे पालकत्व साताऱ्याकडे जाणार कोल्हापूरवर जबाबदारी सोपवली जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. मंत्रिमंडळ तयार करताना कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मंत्री मिळाले आहेत.

त्यापैकीच एखाद्याकडे सांगलीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मंत्रीपदला मुकलेल्या सांगलीला आता पाहुण्या पालकमंत्र्यांची पुन्हा एकदा सवय करावी लागणार आहे. पण हा आयता पालकमंत्री सांगलीला पुरेसा वेळ देणार का? हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.