कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून……

सध्या पावसाळा सगळीकडे सुरू आहे. पावसाळ्यामध्ये अनेक आजारांचा सामना आपणा प्रत्येकालाच करावा लागतो. अशातच डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया यांची साथ दिवसेंदिवस वाढतच आहे.

अशातच जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्याकडून पावसाळ्यात काळजी घेण्याबाबतचे आवाहन करण्यात आलेले आहे. म्हणजेच पाणी कमीत कमी दहा मिनिटे उकळून गाळावे व हे शक्य नसल्यास द्रव क्लोरीन टाकून प्यावे. लेप्टो टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्सी सायकलीन औषध घ्यावे.

उलटी, जुलाब, ताप इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित औषधोपचार घ्यावा. शौचात जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. बाळाला जुलाब झाल्यास क्षार संजीवनीचा वापर करा. पाणी साचल्यास निचरा करून परिसर स्वच्छ ठेवावा. हाता पायाला जखम झाल्यास जंतू विरोधी मलम लावा. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करा.

वैयक्तिक स्वच्छता राखावी. ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोणताही ताप अंगावर काढू नका.उघड्यावरचे अन्नपदार्थ खाण्याचे टाळा. शिळे अन्न खराब झालेली अथवा कापून ठेवलेली फळे खाऊ नका. तर असे आवाहन आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी याचे पालन करून साथीच्या रोगांपासून सुटका मिळवायची आहे.