इचलकरंजी महापालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .शहरवासीयांचे सहभागातून सामूहिक श्रमदानाद्वारे शहरातील विविध 48 ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्याचा कार्यक्रम निश्चित केला होता .शहरातील पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना ,बॅंका, वित्तीय संस्थेचे अधिकार, कर्मचारी, विद्यार्थी ,विविध घटकांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते .
या मोहिमेचे प्रतिनिधीक स्वरूपाचे प्रारंभ आयुक्ताचे ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील शिवतीर्थ येथे करण्यात आला. शहरातील नागरिक महापालिकेचे 1 हजार अधिकारी व कर्मचारी या मोहिमे सहभागी झाले होते . यावेळी शामसुंदर मर्दा, पै.अमृत भोसले ,महापालिकेचे सहा.आयुक्त विजय कावळे, विकास खोळपे ,विजय राजापुरे ,सुभाष देशपांडे, प्रशांत भोसले, इरफान पटेल आदी उपस्थित होते