माझी नियुक्ती सतेज पाटील यांच्या स्वाक्षरीने झाली आहे – संजय कांबळे

इचलकरंजी येथे श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात विणकरी यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या विणकारांच्या मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे यांनी मीच संजय कांबळे यांना काँग्रेसचा शहराध्यक्ष केल्याचे वक्तव्य केले. वस्तूत: प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाला 5 सप्टेंबर 2019 रोजी सोडचिट्टी देऊन काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे.

13 सप्टेंबर 2019 रोजी माझी शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणुन नियुक्ती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा. आमदार सतेज पाटील यांनी केली असताना आवाडे मीच नियुक्ती केली असे म्हणतात हे विधान त्यांना न शोभणारे, दिशाभूल करणारे असल्याचे संजय कांबळे यांनी बोलले आहे. विणकरांच्या मेळाव्यात आमदार आवाडे यांनी संजय कांबळे यांना माझ्याकडे द्या, मी त्यांना आमदार करेन असेही विधान केले.

प्रत्यक्षात प्रकाश आवाडे यांचा गेल्या 39 वर्षाचा इतिहास लक्षात घेतला तर त्यांनी कुटुंबातील व्यक्ती सोडून कुणालाही आजपर्यंत मोठ्या पदावर संधी दिली नाही. त्यामुळे केवळ दिशाभूल करण्यासाठी, विणकारांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी असे विधान केले असावे. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान सैनिक म्हणून काम करत असून काँग्रेसच्या विचारधारेवर माझा विश्‍वास आहे. त्यामुळे तिकीट मिळाले नाही तरी मी काँग्रेस पक्षाच्या आदेशाचे पालन करणार आहे. असे असे वक्तव्य संजय कांबळे यांनी केलेले आहे.

काँग्रेस पक्षामध्ये काही मिळाले नाही म्हणून पक्षाचा त्याग करून गद्दारांच्या यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे आमदार आवाडे सध्या विविध ठिकाणी करत असलेली विधाने ही हास्यास्पद, दिशाभूल करणारी, वैफल्यग्रस्त मनस्थितीतून झालेली आहेत का ? हे पाहणे महत्वाचे आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी 5 वर्षांपूर्वी भाजपला पाठिंबा दिला. तरीही त्यांना 5 वर्षांत भाजपमध्ये प्रवेश मिळवता आला नाही.

तसेच मला कोणीही उमेदवारी दिली तरी चालेल असे म्हणणारे आवाडे मला कसे आमदार करू शकतात ? असा सवाल देखील संजय कांबळे यांनी केलेला आहे.

त्यामुळे गेल्या 5 वर्षाचा आवाडे यांच्या भाषणाचा मागोवा घेतला तर आवाडे हे केवळ लोकांना हसवण्यासाठी, करमणुकीसाठी आपली भाषणबाजी करत आहेत. त्यामुळे गांभीर्याने राजकारण न करता त्यांनी एखादा नवीन हास्य क्लब सुरू करावा, अशी मागणी लोकांमधून होत असल्याचेही भाष्य कांबळे यांनी केलेले आहे.