सत्ताधारी हुतात्मा पॅनेल पुन्हा सत्तेत….

वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी हुतात्मा पॅनेलने २१-० असा विजय मिळविला.विरोधी गटाच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या पराभवाचा धक्का बसला.या निवडणुकीत हुतात्मा पॅनेलचे सगळे उमेदवार सुमारे तीन हजार मतांच्या फरकाने निवडून आले. सुमारे ३९९ मते बाद झाली. वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा गटाने ही निवडणूक लढवली.

या कारखान्याच्या बहुतेक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. या वेळीही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी हुतात्मा गटाने प्रयत्न केले. मात्र, विरोधी गटाला निवडणूक हवी होती. त्यातून २१ पैकी बारा जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीत सत्ताधारी हुतात्मा गटाने विरोधी गटाचा धुव्वा उडवला.

सत्ताधारी गटाच्या नऊ उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीनिमित्त वैभव नायकवडी यांच्यासह गौरव नायकवडी, सौ. विशाखा कदम या नायकवडी कुटुंबातील तिघांना संचालक मंडळात संधी मिळाली आहे.