खानापूर टेंभूच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी तयार केलेल्या जय हनुमान पाणीपुरवठा संस्थेच्या सुहास शिंदे अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य व सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे यांची निवड केली. टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील गोरेवाडी डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभ क्षेत्रासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी टेंभूच्या सुळेवाडी येथील कार्यालयात झालेल्या संचालकांच्या निवड व प्रशिक्षण कार्यक्रमात ही निवड केली.
यावेळी या संस्थेचे संचालक म्हणून सयाजी शिंदे, राजाराम जाधव, महिबुद्दीन मुजावर, आनंदा शिंदे, महादेव कापसे, इंदुबाई खोबरे, धोंडीराम जाधव, शिल्पा शिंदे, भारती शिंदे, काशिनाथ जाधव व रामचंद्र धेंडे यांची निवड केली. कार्यक्रमास एस. एन. होवाळे, अजित घाणेकर व माधुरी कोळी हे अधिकारी उपस्थित होते.
