इस्लामपूरात मोफत चष्म्यांचे वाटप!

इस्लामपूर हे शहर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. नुकतेच मोफत आरोग्य शिबीर इस्लामपूर मध्ये संपन्न झाले. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुका व मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील ८ गावांत लोकनेते राजारामबापू पाटील आरोग्य शिबिरात झाले.

त्यातील १०१५ रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या. शिबिरातील १० हजार ५०० रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप झाले. हे शिबिर आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित गावांत राबविण्यात आले.