सध्या आषाढी वारीनिमित्त गावागावाहून दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. इचलकरंजी आषाढी वारीमधील वारकऱ्यांसाठी २१ हजार भाकरी- खरडा शहरातून लोणंदला पाठविण्यात आला. सुमारे एक हजार कुटुंबांतून भाकरीचे संकलन करण्यात आले. एक दशकापासून ही परंपरा दुर्गामाता प्रतिष्ठानने जपली आहे. प्रतिष्ठानकडून प्रत्येक वर्षी वारीमध्ये जाऊन भाकरी खरडा याचे वारकऱ्यांना वाटप केले जाते. त्यासाठी अण्णा रामगोंडा शाळा परिसरातून भाकरीचे संकलन करण्यात येते.
यंदा २१ हजार भाकऱ्यांचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर पाण्याची बाटली, लोणचे, पापड, भाकरी खरडा, राजगिरा लाडू, शेंगदाणा चटणी, आदी गोळा करण्यात आल आहे. रविवारी पहाटे माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते भाकरीचे वितरण करण्यात आले. यावेळी इचलकरंजी शहरातून लोणंद येथील वारकऱ्यांसाठी भाकरी खरडा पाठविण्यात आला.
तानाजी रावळ, भगतराम छाबडा, जयकुमार काडाप्पा, राजू खोत, राहुल निमणकर, आदींच्या उपस्थितीत भाकरी घेऊन गाडी रवाना झाली. यावेळी संतोष हत्तीकर, महेश कवडे, सुधाकर कुलकर्णी, विलास रानडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.