सध्या ओबीसी आरक्षणाची जोरदार चर्चा सुरू आहे. ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषणाचा मार्ग निवडला अनेक नेते मंडळींनी देखील ओबीसी आरक्षणासाठी आपला पाठिंबा दर्शवला. प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणासाठी दहा दिवस उपोषण केले.
छगन भुजबळ व शिष्ठ मंडळाची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर त्यांनी राज्यभरात अभिवादन दौरे सुरू केलेले आहेत. उद्या म्हणजेच 12 जुलैला शुक्रवारी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
सकाळी अकरा वाजता सांगोला नगरीमध्ये त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. तसेच शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात उद्या ओबीसींच शक्ती प्रदर्शनही होणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवावा असे आवाहन सकल ओबीसी समाजाकडून करण्यात आलेले आहे.