इचलकरंजीत राष्ट्रवादी गटातर्फे नवमतदार नोंदणी अभियान लवकरच होणार सुरू

इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये नवीन मतदार नोंदणी अभियान लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादी मधील नावांमध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती तसेच विधानसभा मतदारसंघांतर्गत पत्ता बदललेल्या मतदारांची नोंदणी तसेच मतदारांची नावे वगळण्याचे काम देखील केले जाणार आहे.

यासाठी मतदारांनी येताना रहिवासाचा पुरावा, आधार कार्ड, वय वर्ष अठरा पूर्ण असलेला वयाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे सोबत आणावयाचे आहेत. हे अभियान दिनांक 24 जुलै ते 25 ऑगस्ट या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामुळे याचा सर्व मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी केलेले आहे.