आमदार ब्रह्मानंद पडळकर यांचा लवकरच खानापूर दौरा!

विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये नेते मंडळींनी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या 25 वर्षांमध्ये आटपाडी व खानापूर तालुक्यावर काही ठराविक घराण्यांनीच वर्चस्व ठेवले होते.

त्या वर्चस्वला आता सुरुंग लावण्यासाठी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून जनतेने ब्रह्मानंद पडळकर यांना पसंती दिली असून लवकरच ते आता आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा दौरा सुरू करणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर यांनी दिलेली आहे. आटपाडी तालुक्यातील करगणी, आटपाडी, खरसुंडी, दिघंची या चार जिल्हा परिषद गटांमध्ये असणाऱ्या पंचायत समिती गणातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांच्या भावना व सर्वसामान्य जनतेपर्यंत जातं ते आपली भूमिका त्यांच्यासमोर ठेवणार आहेत.