इचलकरंजी येथील संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत श्रावणबाळ, संजय गांधी निराधार आणि राष्ट्रीय वृध्दापकाळ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना अंतर्गत १५०० अर्ज मंजूर करण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून दरमहा १५०० रुपये इतके अनुदान मिळणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांनी दिली. दरम्यान, जुन्या लाभार्थ्यांचे जून महिन्यापर्यंतचे अनुदान जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर तहसीलदार शेरखाने यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत समिती समोर विविध योजना अंतर्गत १५०० अर्ज ठेवण्यात आले होते.
ते सर्व मंजूर करण्यात आले असून या लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून दरमहा १५०० रुपये लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी एक हजार असलेले अनुदान १५०० रुपये केले आहे. तर जुन्या लाभार्थ्यांची गरज लक्षात ठेवून जून २०२४ पर्यंतचे अनुदान जमा केले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आणखीन एक किंवा दोन बैठका घेऊन पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष डाळ्या यांनी सांगितले.