केंद्र सरकारच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी आकारलेले विलंब शुल्क रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक संघटनांच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. त्याच अनुषंगाने कोल्हापूर रिक्षा, टॅक्सी वाहनधारक समितीतर्फे मंगळवारी रिक्षा बंदची हाक देण्यात आली होती.
या बंदमध्ये इचलकरंजी शहरातील महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना, इंदिरा ऑटो युनियन, विद्यार्थी वाहतूक संघटना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज रिव्हर्स, महात्मा फुले रिक्षा स्टॉप, शिवसेना रिक्षा चालक संघटना आदी सर्वच संघटना सहभागी झाल्या होत्या.दिवसभर रिक्षा नसल्याने अनेक नागरिकांना पायपीट करावी लागली.
या आंदोलनाचे शहरातील विविध राजकीय व सामाजिक तसेच वाहतूक संघटनेने पाठिंबा दर्शवला इचलकरंजीत सर्वच रिक्षा संघटनांनी सहभागी घेत कडकडीत बंद पाळला. दिवसभर रिक्षा बंदमुळे प्रवासी तसेच नागरिकांना मात्र पायपीट करावी लागली.