इस्लामपुरातील बहे येथील कृष्णा नदीवरील पूल हा सांगली व सातारा जिल्ह्याला जोडणारा आहे. या पुलाच्या बांधणीचा शुभारंभ 1958 मध्ये करण्यात आला. दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले. दोन जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा पूल आजही उपयोगी ठरलेला आहे. या पुलावरून ये जा करणे प्रवाशांना खूपच धोकादायक झाले आहे. पुलाच्या दुरुस्ती कामासाठी परिसरातील नागरिकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे निधी उपलब्ध करण्याबाबतची सातत्याने मागणी केली होती. याची दखल घेत परिस्थितीची माहिती घेऊन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुरुस्ती कामासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे पाठविण्याबाबत सूचना केल्या होत्या.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील कृष्णा नदीवरील बहे पुलाच्या दुरुस्ती कामासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या विशेष सहकार्यातून व भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख शशिकांत भोसले पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सात कोटी व नदी काठावरील गावांना संरक्षक भिंतीसाठी पाच कोटी असा एकूण रक्कम 12 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी दिली आहे.