इस्लामपूर येथील उरूण परिसरातील असलेल्या जागृत देवस्थान सिद्धनाथ जोगेश्वरी देवाची यात्रा श्रावणातील तिसऱ्या रविवारी, दि. २५ ऑगस्ट रोजी होत आहे. यानिमित्त महाअभिषेक आणि महाआरती होणार असल्याची माहिती पुजारी चंद्रकांत पाटील यांनी दिली. सनई चौघडा, झांज पथकाच्या गजरात सकाळी १० वाजता पालखी सोहळा निघणार आहे.
पालखी पाटील गल्ली, उदय चौक, तानाजी चौक, पवार गल्ली, शिवाजी चौक अशी मार्गस्थ होईल. त्यानंतर दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सिद्धनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील, खजिनदार रमेश पाटील, अशोक पाटील, दिलीप पाटील, सुजय पाटील, विशाल पाटील, गणेश पाटील, अतुल पाटील, सिद्धार्थ पाटील हे यात्रेचे संयोजन करत आहेत. यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिद्धनाथ प्रतिष्ठानने केले आहे.