गुणवत्तेसाठी शिक्षकांचे योगदान गरजेचे – अॅड. सरनोबत

पेठ गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समाज आग्रही असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचे योगदान गरजेचे आहे. शाळेची प्रतिमा समाजाच्या मनात उतरवता आली पाहिजे, असे मत कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन समन्वयक अॅड.बी. एल. सरनोबत (Adv. Sarnobat) यांनी व्यक्त केले. पेठ (ता.वाळवा) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय गुणवत्ता वाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपअधीक्षक एस. एल. माने होते. सरनोबत म्हणाले, शालेय आराखडा तयार करून शाळांचे मूल्यांकन केले जाईल. शिक्षकांनी तणावमुक्त वातावरण काम करावे. माझी शाळा माझा अभिमान यास अनुसरून अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासासाठी झटले पाहिजे.

यावेळी एस. एल. माने म्हणाले, शिक्षकांनी माझी शाळा, माझी जबाबदारी या भूमिकेतून निष्ठेने काम करावे. अभ्यासपूर्ण अध्यापन करावे. यावेळी पर्यवेक्षिका मंजुषा कुलकर्णी, जयश्री शेळके, प्रकाश गावडे, अर्चना ढवळीकर, उमा ठाणेकर, वर्षाराणी बंडगर, शिला माळी, एस.पी. डबाणे, एम. व्ही. भोपळे, भाग्यश्री पवार, सरस्वती कदम, भारती गावित, नलिनी पाटील, माधुरी पाटील, धनंजय बामणे, ए. आर. पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक एन. डी. पाटील यांनी केले. आभार आर. पी. मोहिते यांनी मानले.