इस्लामपूर येथे राजारामबापू कारखाना व उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने लोकनेते राजारामबापू स्मृती आरोग्य कार्यक्रमांतर्गत उद्या रविवारी (दि. ४ फेब्रुवारी) महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे. डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. इतर आजारांचीही तपासणी होणार आहे. शासकीय योजनेअंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया मोफत व सवलतीत केल्या जाणार आहेत.