इचलकरंजीत आषाढी एकादशीनिमित्त घोरपडे नाट्यगृहात रंगणार ‘रंगी रंगला श्रीरंग कार्यक्रम’

आषाढी एकादशी ही सर्व एकादशीमध्ये मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्वत्र भक्तीमय वातावरण देखील आपणास पहावयास मिळते.

तर बुधवारी म्हणजेच 17 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशी निमित्त श्रीमंत ना.बा घोरपडे नाट्यगृह मध्ये श्री विठ्ठल भक्ती गीते व भावगीतांचा रंगी रंगला श्रीरंग एक भक्तिमय संध्याकाळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था इचलकरंजी यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमातून श्री विठ्ठल रुक्मिणींचे विविध भक्ती गीते व भावगीतांचे सादरीकरण होणार असून एक भक्तिमय संध्याकाळ रसिक श्रोत्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. सदर कार्यक्रमासाठी मोफत प्रवेशिका असणार आहे.