मराठा आरक्षणासाठी स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातूने केले मुंडन

सध्या महाराष्ट्रभर सुरु असणान्या सुरू असणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेव देशमुख यांनी पाठीचा देत मंचन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. शेतकरी कामगार पक्ष मराठा समाज पाठीशी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे.

सांगोला तालुक्यातही आरक्षणाच्या मागणीचा रेट वात असताना कलाम (ता सांगोला) येथील आमरण उपोषणाला बसलेले दीपक पवार यांची भेट घेत मराठा आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवार (ता. ३१) रोजी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुंडण करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळो शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे.

त्यासाठी वाटेल ती किमत मोजायला तयार असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी धनगर समाजात हात घालून जीवनमान जगत आहेत. इतर समाजाच्या तुलनेत या दोन्ही समाजांची लोकसंख्या अधिक आहे. मात्र पूर्वीपासूनच शेती, पशुपालन व्यवसायाशी हा समाज निगडित असल्याने शिक्षण, नोकरीपासून तो वंचित राहिला. त्यात आरक्षणाचा लाभही त्यांना मिळाला नाही त्यामुळे तो अतिमागास राहिला आहे.

त्यामुळे मराठा व धनगर समाजाला कोणत्याही परस्थितीत आरक्षण मिळायला हवे, या लढयात भी अग्रभागी असेन अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी समाजबांधवाना डॉ. देशमुख यांनी यावेळी समाजबांधवाना दिली. यावेळी बाबासाहेब देशमुख डॉ.पांच्यासोबत टापरे वा जाधव, नारायण बापू गायकवाड, जोतिराम काटकर, गजेंद्र गायकवाड, हणमंत गायकवाड, रमेश चव्हाण,संजय शेटे व चैतन्य गायकवाड या तरुणांनी आपले मुंडण करून मराठा आरक्षणासाठी विलंब करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदवला.