राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर (NCP Crisis) सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.तसेच नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणही सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर वाद सुरू झाला. पक्षाचे जवळपास 43 आमदार आहेत तर शरद पवारांकडे (Sharad Pawar) 12 आमदार आहेत. त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणीची शक्यता आहे.