मराठा समाजाच्या मागणीनुसार पंढरपूमध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिले मराठा भवन उभारण्यात येणार आहे. या भावनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी होणार आहे. भूमिपूजन झाल्यानंतर भवन उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात येणार आहे. मराठा समाजासाठी (Pandharpur) पंढरपुरात मराठा भवन उभे करण्यात यावे; अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने मागणी मान्य करत पंढरपूरमध्ये मराठा भवनासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्य सरकारच्या या निधीतून सर्व सोयीनियुक्त असे मराठा भवन उभारण्यात येणार आहे. या भवनाच्या बांधकामासाठीचे भूमिपूजन आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी करण्यात येत आहे. यानंतर भवन उभारणीच्या कामाला सुरवात होणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मराठा भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार असून पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होईल. यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले यांची उपस्थित राहणार आहेत.