इस्लामपुर येथील गांधी चौकातील पुरातन श्री राई रुक्मिणी- विठ्ठल मंदिरात आषाढी उत्सवाचे आयोजन विठ्ठलदेव ट्रस्टतर्फे केले आहे. दि.१६ जुलै रोजी सुरुवात होणार असून दि. २२ जुलै रोजी उत्सवाचा सांगता समारंभ होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आळवेकर यांनी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष वाळवेकर म्हणाले. हे मंदिर भागातील श्री विठ्ठल राई-रुक्मिणी अशा तीन मूर्ती एकत्र असलेले एकमेव असे आहे. मंदिर २०० ते २५० वर्ष पुरातन आहे. हा उत्सव पण २००-२५० वर्षे एवढी परंपरा लाभलेला इस्लामपुर नगरीतील एकमेव आहे.
उत्सवाला मंगळवार दि.१६ जुलै रोजी सुरुवात होणार असून बुधवार दि. १७जुलै आषाढी एकादशी निमित्त पांडुरंग महादेव पाटील आणि त्यांच्या सौ. शैलजा पाटील, प्रा. रामचंद्र सोदे, डॉ. सौ. लोंढे यांच्याहस्ते सकाळी ७ वाजता महापूजा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त दररोज संध्याकाळी महिला मंडळाचे भजन व ह्.भ.प. उदय बुवा कुलकर्णी मिरज यांचे सुश्राव्य कीर्तन दि.१७ ते २२ जुलैपर्यंत रोज संध्याकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत आयोजित केला आहे.