सोलापूर जिल्ह्याचे तापमान पोहचले ४४ अंशावर…..

सोलापूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य वाढ होऊन ते आज मंगळवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान ४४ अंश झाले. मंगळवारी नोंदल्या गेलेल्या तापमानाची नोंद यंदाच्या वर्षातील उच्चांकी ठरली आहे.मंगळवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे, महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान, विभागाच्या वतीने यानिमित्ताने वर्तविण्यात येत आहे.शुक्रवार, दि. ५ एप्रिल रोजी या हंगामातील ४३.१ अंश इतके सर्वाधिक तापमान होते. या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे.