कॅम्पस प्लेसमेंट मध्ये अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज च्या मेकॅनिकल विभागातील अजित मासाळ, श्रियश ढोले व मयूर आतकर या विद्यार्थ्यांची भारत फोर्ज या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. तन्मय ठोंबरे यांनी दिली. भारत फोर्ज या कंपनीच्या निवड समितीने फॅबटेक पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. चाळणी परीक्षा व मुलाखत या निवड प्रक्रिये मधून विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.
भारत फोर्ज हि मेकॅनिकल क्षेत्रातील नामांकित कंपनी असून हि कंपनी कनेक्टिंग रॉड व क्रैंकशाफ्ट तयार करण्याचे काम करते. तसेच कल्याणी मोबिलिटी या नावाने जर्मनी व अमेरिका याठिकाणी कंपनीच्या शाखा आहेत. अशा मल्टिनॅशनल कंपनी मध्ये शिक्षण पूर्ण होण्या आधीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज ने उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, डायरेक्टर डॉ. डि. एस. बाडकर, पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. शरद पवार मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.