पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत पुरुषांच्या व महिलांच्या तायक्वांदो स्पर्धा २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालय कोळा येथे पार पडल्या सोलापूर विद्यापीठाच्या इतिहासातच पहिल्यांदाच या स्पर्धा ग्रामीण भागात होऊन सुद्धा स्पर्धेसाठी सेनसार चा वापर करण्यात आला.
या विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धे मध्ये डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या मुला मुलीने अक्षरशा पदकांची लय लूट केली व सलग १९ वर्षे महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम ठेवले. महिला मध्ये नेहा हनुमंत केसकर व राजलक्ष्मी प्रकाश बाबर ( पहिला क्रमांक ) मिळवला दिव्या जानकीराम घनगाव व प्रियांका अनिल काकडे यांनी ( दुसरा क्रमांक) मिळवला पुरुष गटात आकाश संजय कदम अजित भगवान कोळेकर प्रशांत बंडू जाधव दशरथ दत्तात्रय रुपनर अजय तुकाराम घुसाळे या सर्वांनी (पहिला क्रमांक) मिळवला प्रशांत पोपट माडेकर ओंकार शिवाजी नलावडे सरगर परमेश्वर दत्तात्रेय या सर्वांनी ( दुसरा क्रमांक ) मिळवला तसेच आबासो किसन होंनमाने. अतुल सुखदेव काळेल रोहित पोपट लवटे सर्वांनी ( तिसरा क्रमांक ) मिळविला. वरील सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलांनी व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले.