मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असून अनेक आजारी रुग्णाला सेवे अभावी ताटकळत बसावे लागत आहे.त्यामुळे ओपीडी, अंतररुग्ण विभाग, विविध प्रकारचे सेवा, वैद्यकीय दाखले देण्यात डॉ पद्माकर अहिरे दिरंगाई करीत असून रुग्णांना त्याचा मानसिक त्रास सोसावा लागत आहे तरी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नेमणूक करण्याची मागणी जनतेतून होत आहे.वैद्यकीय क्षेत्रामध्ये आरोग्य विभाग हा महत्त्वाचा भाग मानला जातो .
शासन आरोग्य विभागावर कोट्यावधी रुपये खर्चून सामान्य जनतेला उपचार मिळावा हा हेतू साधत असला तरी वैदिकिय अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण रुग्णालयतील वैद्यकीय अधिकारी मुळे बदनाम होत असून विविध प्रकारच्या सेवा देण्यास नकार देऊन टाळाटाळ करीत आहे.
ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ पद्माकर अहिरे यांची नेमणूक काही महिन्यापूर्वीच केली होती. परंतु ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णास विविध प्रकारच्या अद्यावत सेवा द्यायच्या सोडून अनेक अडचणीस तोंड द्यावे लागत आहे.