लाडका भाऊ योजनेचा अर्ज करण्याची पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज कोठे करावा? सविस्तर माहिती…..

राज्यात सद्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची चर्चा सुरु आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातून लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. ही योजना बेरोजगार युवकांना मदत करण्यासाठी आहे.

लाडका भाऊ योजनेअंतर्गत जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

आवश्यक कागदपत्रं कोणती?
आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बॅंक खाचे तपशील, शैक्षणिक पात्रता मार्कशीट, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, ई-मेल आयडी

पात्रता

महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असावा
वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे
बेरोजगार असावा आणि कोणतीही सरकारी नोकरी असावी
कौटुंबिक उत्पन्न : निश्चित केलेल्या पात्रता निकषांमध्ये बसणारे असावे.

असा करा अर्ज

प्रथम माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाइटला जा.

नवीन वापरकर्ता नोंदणी निवडा : वेबसाइटवर “नवीन वापरकर्ता नोंदणी” पर्याय निवडा आणि क्लिक करा.

आवश्यक माहिती भरा : नोंदणी फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता आणि वय गट भरा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा : आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

फॉर्म सबमिट करा: सर्व माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड करून “सबमिट” बटणावर क्लिक करा.